वाघापूर

नावाविषयी इतिहास

प्राचिनकाळी कोल्हापूर व व्याघ्रापूर या दोन नावाचे बलाढय राक्षस येथे घनदाट अरण्यात रहात होते.  व्याघ्रासूर राक्षस येथील जनतेला अत्यंत त्रास देत होतो.  त्याचा वध करणेसाठी हिमालय पर्वतातूर श्री. केदारनाथ व सेनापती श्री. भैरवनाथ हे दोन्ही देव व्याघ्रापूर राक्षसांचा वध करणेसाठी या घनदाट अरण्यात आले होते.

व्याघ्रापूर राक्षसाने परमेष्वराची भक्ती करुन कोणतेही रुप धारण करुन या दोन्ही देवापुढे आव्हान निर्माण करत होता.  द्योवटी व्याघ्रापूर राक्षसाने बेडकाचे रुप धारण करुन गिळकृत करण्याचा आदेष दिला त्या राक्षसाचा वध झाला त्या राक्षसाचे नावावरुन वाघापूर हे नाव पडले आहे.

गावाचे ग्रामदैवत श्री. केदारनाथ, श्री. ज्योतीलींग या देवाची यात्रा नागपंचमी, दसरा प्रत्येक आमावास्या, पौर्णिमा व रविवारी भरते या यात्रेसाठी महाराच्च्ट्र कर्नाटक, आंध्रप्रदेष या राज्यातून लाखो भाविक येतात व भक्तीने दर्षन घेवून जातात.

हे देवस्थान सर्पाविच्चयी प्रसिध्द असून अनेक सर्पदंष पेषंट, जुनाट आजार असणारे पेंषट फक्त तिर्थ अंगारा घेवून बरे झाले आहेत.

सर्प हा द्योतकयांचा मित्र आहे.  त्याला मारु नका हे या देवामुळे येथील गुरव उपदेष करतात.

देवाची वार्च्चिक उत्पन्नातून गावी रस्ते, सुंदर देवालय, धर्मषाळा, मंदिराचे सभोवती ऊन व पावसाचा भाविकांना त्रास होवू नये म्हणून पत्र्याचे भव्य छत बांधणेत आले आहे.

या देवची महती मोठया प्रमाणात भक्तांना होत आहे.  त्यामुळे गावी भाविकांची गर्दी होत आहे.  सन २००७-०८ साली महाराच्च्ट्र द्याासनाने क वर्ग पर्यटन स्थळ घोच्चित केले आहे.

भाविकांचे सुखसोयीसाठी या वर्च्चीच रु.१० लाख अनुदान प्राप्त झाले आहे.  या अनुदानातून रस्ते, गटर्स, ही कामे झाली आहेत.  तसेच वाहनतळ ध्यान मंडप, स्वच्छतागृह इ. साठी ८६ लाखाचा प्रस्ताव द्याासन मंजूरीसाठी पाठवणेत आला आहे.

दसरा सण या देवाचे नवरात्र उत्सव नऊ दिवस मोठया प्रमाणात भरतो.  या वेळी प्रत्येक दिवषी आरती, पालखी व समाज उपयोगी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात.

उदा. दारुबंदी, ले लाडकी, निर्मलग्राम, तंटामुक्त गांव, दांडपट्टा इ.

गावात १०० टक्के द्याौचालय असून उघडयावर कोणीही द्याौचालयास बसत नाही.  सन २००७-०८ पंचवार्च्चिक ग्रा.प.निवडणूक बिनविरोध केली आहे.

गावी दारुबंदी आहे.  तरुण मंडळे यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग आहे.  गावी बारा बलुतेदार ग्रामस्थ रहात आहेत गावी कोणतीही जातीय दंगल झालेली नाही.